टिटवी आणि पाणी
भारतात सात प्रकारचा टिटवी चा अढळ आहे , या मधील चार प्रकार हे स्थलांतरित आहेत , तुरेवाला टिटवी , राखी डोक्याची टिटवी , पांढऱ्या शेपटीची टिटवी , संघचर टिटवी ही ती चार पाहुणे पक्षी हि सर्वच भारताचे हिवाळी पाहुणे , या सर्व टिटवी चा अधिवास पहिला तर तो दलदल , पाणथळ जागा , भात शेती , तलावाचे काठ असा दिसून येतो म्हणजेच काय तर पाण्यावर या टिटवीचे जास्त आहे , स्थानिक तीन जाती आहेत नदी टिटवी (River lapwing ) , टिटवी ( Red wattled lapwing ) आणि माळटिटवी (Yellow wattled lapwing ) यातील नदी टिटवी चा नावातच नदी आहे तसेच अधिवासासाठी ती पूर्णतः मोठ्या नदीचा पत्रावर अवलंबून आहे ,टिटवी सुद्धा पाण्याचा आजूबाजूला प्रामुख्याने दिसून येते , नदी , तलाव ,वर्षाभू डबकी यांवर टिटवीचा अढळ सतत दिसून येतो ,मिलन काळात म्हणजे उन्हाळ्यात तर १०० ते १५० चा संख्येत तलावावर त्यांचा जमाव जमतो , काही तलावाच्या परिसरात घरटी सुद्धा करतात .
टिटवी चे अवलंबत्व पाण्यावर असलं तरी घरट्यासाठी पाणवठयाचा दूर सुद्धा ती जाते , सर्वच टिटवी जाती मध्ये लाल मुखी टिटवी सर्वात यशस्वी म्हणावी लागेल , शहरीकरणाला तिने उत्तम प्रकारे स्विकारले असल्यामुळे तिचा अढळ आणि संख्या चांगलीच वाढत आहे , १९८० - ९० पासूनच तिचा घरावर घरटं बनवून अंडे देण्याचा बदलाचा नोंदी पाहण्यास मिळतात , जगण्यासाठी टिटवीने हि सर्व अनुकूलता स्विकारली असली तरी पाण्यावरचे तिचे अवलंबत्व टिटवी जाती प्रमाणे तसच आहे , असं नेहमी अनुभूत आहे कि टिटवी ( Red wattled lapwing ) जरी घरटं बनवतांना पाण्यापासून दूर माळरानावर सुद्धा जाते पण अंडयांचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ती दुपारी सतत पाणवठ्याच्या चक्रा करत राहते तसेच अंड्यातून सर्व पिल्लं बाहेत आल्यानंतर काही वेळातच ती पिलांचे स्थलांतर जवळील पाणवठ्यावर किंवा डबक्यावर करते , कधी कधी या प्रवासात रहदारीचा रस्ता सुद्धा पिलांना घेऊन पायानेच पूर्ण करणे असतो पण तरी सुद्धा हा प्रवास केला जातो , एकदा पाणवठ्यावर पोहचले कि पिल्लं उडण्यास सक्षम होई प्रयत्न पाणवठ्यावरच दिसून येतात .
आता माळटिटवी बद्दल बोलू , माळटिटवी टिटवी जाती पेक्षा वेगळी ठरते कारण तिने पाण्यावरचे अवलंबत्व खूप कमी केलं आहे , माळटिटवी नदी , तलाव परिसरात दिसत असली तरी कोरडे रुक्ष माळरान हेच तिचे अधिवास प्रामुख्याने , पाणी पिणे आणि हंगामात पोट ओले करणे या कामासाठी ती पाण्यावर अवलंबून दिसून येते पण टिटवी ( RWL ) सारखे ती पिलांना पाणवठ्यावर स्थलांतर करताना कधी दिसून आली नाही , पिल्लांचा जन्मापासून ती उडण्यास सक्षम होई पर्यंत ती आई वडिलांचा सीमा क्षेत्र ( territory ) सोडून जात असल्याचे कधी दिसले नाही , आपल्याला माहीतच आहे कि माळटिटवी आपल्या पिल्लाना कधीच अन्न भरवत नाही त्यामुळे पिल्लाच्या पाण्याची गरज कशी भरून निघते हा सध्यातरी माझा साठी न सुटलेले कोडेच आहे , माळटिटवी ची अशी बरीच प्रश्न अनुत्तरीत आहेत , असू द्या काही हरकत नाही कारण माझी संगत तरी कुठे संपली आहे .
: संदीप साखरे , अकोला
No comments:
Post a Comment